फ्युएलस्टिक हे इंधन कंडिशनर आहे, जे द्रव स्वरूपात उपलब्ध आहे, ज्याचे अनेक फायदे आहेत.
१) हे इंधनाची ३०% पर्यंत बचत करते. मग ते पेट्रोल , केरोसीन, डिझेल किंवा फर्नेस ऑइल असो.
२) हे इंधन इंजेक्शन प्रणाली साफ करते आणि कार्बन साठण्याचे प्रमाण कमी करून , इंजिनाला निरोगी स्थितीत ठेवते.
३) यामुळे इंजिनची कार्यक्षमता वाढते.
४) त्याचा नियमित वापर केल्याने वाहनाचा देखभाल खर्च ४०% पर्यंत कमी होतो. (वाहनाच्या परिस्थितीनुसार)
५) कार्बन मोनॉक्साईडची निर्मिती प्रतिबंधित करून हानिकारक वायूंपासून पर्यावरणाचे रक्षण करते.
६) शेवटी, ते परकीय चलनाचा एक भाग वाचवते, कारण बहुतेक सर्व इंधने आयात केली जातात.
तुम्ही ते स्कूटर, मोटरसायकल, ऑटो-रिक्षा, कार, जीप, टेम्पो, ट्रक, टँकर, बस, ट्रॅक्टर, क्रेन, जेसीबी, पोकलेन, तसेच जहाजे आणि बोटी या वाहनांमध्ये वापरू शकता.
आपण ते कृषी, औद्योगिक तसेच रस्ते बांधकाम इथे लागणाऱ्या पेट्रोल किँवा डिझेल पंपासाठी वापरू शकता.
तुम्ही ते डिझेल, पेट्रोल जनरेटरमध्ये वापरू शकता.
थोडक्यात, जवळपास कोणत्याही इंजिनमध्ये जिथे पेट्रोल, डिझेल वापरले जाते तिथे तुम्ही फ्युएलस्टिक वापरू शकता.
१) फ्युएलस्टिक म्हणजे काय?
फ्युएलस्टिक हे इंधन कंडिशनर आहे जे 30% पर्यंत इंधन वाचवते, इंजिनची कार्यक्षमता वाढवते, अधिक ज्वलनशिलता शक्ती देते, उत्सर्जन कमी करते आणि परकीय चलन वाचवते.
फ्युएलस्टिक हे पाम तेलाच्या अर्कात सोडलेल्या अत्यंत अभिनव अश्या सेंद्रिय संयुगांचे मिश्रण आहे.
यातील सेंद्रिय संयुग, ज्यांची विशिष्ट कार्ये आहेत जसे की इंजिन इंधन प्रणाली साफ करणे, आणि कॉम्प्रेसर चेंबर साफ करणे , ऑक्टेन/सेटेन मूल्ये वाढवणे, आण्विक रचना बदलणे जेणेकरून इंधन समान रीतीने जळते.
थोडक्यात, यामुळे न जळालेले इंधन जे पर्यावरणात सोडले जात असते तसे न होता . ,फ्युएलस्टिक इंधनाच्या पूर्ण ज्वलनात मदत करते. अशा प्रकारे याला ज्वलन बूस्टर म्हटले जाऊ शकते जे इंधन पूर्णपणे जळण्यास मदत करते.
यामुळे इंधनाची बचत, इंजिनची कार्यक्षमता सुधारणे, उत्सर्जन कमी होते व आपल्या पैश्यांची बचत होते.
२) फ्युएलस्टिक हे घन आहे की द्रव पदार्थ आहे ?
फ्युएलस्टिक हा एक द्रव पदार्थ आहे जो वापरण्यास योग्य असलेल्या बाटल्यांमध्ये उपलब्ध आहे.
३) ते कसे बनते?
अँटिऑक्सिडंट्ससह इतर सहा गोष्टींचे उत्कृष्ट मिश्रण करून ते पाम तेलाच्या अर्कातून एका विशिष्ट पद्धतीने बनवले जाते. उत्पादन आणखी चांगले करण्यासाठी त्यात नेहमीच सुधारणा होत असते.
४) मी फ्युएलस्टिक कुठे कुठे वापरू शकतो?
तुम्ही ते स्कूटर, मोटरसायकल, ऑटो–रिक्षा, कार, जीप, टेम्पो, ट्रक, टँकर, बस, ट्रॅक्टर, क्रेन, जेसीबी, पोकलेन, तसेच जहाजे आणि बोटी या वाहनांमध्ये वापरू शकता.तुम्ही ते डिझेल/पेट्रोल जनरेटरमध्ये वापरू शकता.
थोडक्यात,जवळपास कोणत्याही इंजिनमध्ये जिथे पेट्रोल, डिझेल वापरले जाते तिथे तुम्ही फ्युएलस्टिक वापरू शकता.
५) माझ्या पेट्रोल किंवा डिझेल वाहनात फ्युएलस्टिक वापरणे सुरक्षित आहे का?
होय. ते स्कूटर, कार, जीप, ट्रक आणि बसेस तसेच जेसीबी, अर्थ मूव्हर्स, पोकलेन इत्यादी सारख्या दोन/चार स्ट्रोक पेट्रोल किंवा डिझेल वाहनांमध्ये वापरणे पूर्णपणे सुरक्षित आहे, अनेकांनी याची चाचणी केली आहे.
गेल्या दोन दशकांपासून ते न्यूझीलंड तसेच बऱ्याचशा आफ्रिकन देशात व भारतात काही ठिकणी वापरले जाते.
६) सामान्य तपमानावर ते ज्वलनशील आहे का?
नाही. फ्युएलस्टिक सामान्य तपमानावर ज्वलनशील नाही आणि तुमच्या वाहनातही ते सुरक्षितपणे साठवले जाऊ शकते.
७) ते कसे कार्य करते?
फ्युएलस्टिक एकदा इंधनात मिसळल्यानंतर इंधन कंडिशनर म्हणून काम करते. प्रथम ते कम्बशन चेंबर तथा फ्युएल इंजेक्शन सिस्टीम मध्ये साठलेल्या कार्बनची सफाई करते.
ते आण्विक रचना आणि चिकटपणा अशा प्रकारे बदलते की जास्तीत जास्त इंधन जळते . वाया जाणारे इंधन आता पूर्णपणे वापरले जाते.
मुख्यत्वे इंधनाचे जवळपास संपुर्ण ज्वलन करण्यास फ्युएलस्टिक सहाय्यभूत होते त्यामुळे आपले इंधन वाया न जात ते संपूर्णपणे वापरले जाते आणि म्हणूनच आपल्याला जास्त फायदा मिळतो. कमी इंधनाचा वापर करून आपल्या वाहनाची कार्यक्षमता वाढते.
८) ते दोन किंवा चार स्ट्रोक इंजिनसाठी आहे का?
दोन किंवा चार–स्ट्रोक इंजिनसाठी फ्युएलस्टिक वापरले जाऊ शकते.
९) मी माझ्या वाहनामध्ये फ्युएलस्टिक कसे वापरू ? शिफारस केलेले प्रमाण काय आहे?
इंधन कॅप उघडा – अर्धे इंधन टाका, नंतर फ्युएलस्टिक घाला आणि उरलेले इंधन घाला .
1 लिटर पेट्रोल/डिझेलसाठी 1 मिली फ्युएलस्टिक वापरण्याची शिफारस केली जाते.( एक मिलिलिटर एक लिटर इंधनासाठी )
१०) मी फ्युएलस्टिक कसे वापरु ?
कृपया या पेज खाली दिलेला सूचना विभाग तपासा आणि फोटो /व्हिडिओ पहा. या सूचनांसाठी एक स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे.
आपल्या माहितीसाठी चित्रतसेच व्हिडीओ उपलब्ध आहेत , ते कृपया पहावे.
फ्युएल्स्टिकच्या बाटलीवरती मिलिलिटरच्या खुणा आहेत त्यानुसार आपण तेवढ्या प्रमाणात फ्युएल्स्टिक वापरू शकता.
११) एकदा मी फ्युएलस्टिक वापरल्यावर काय होईल?
एकदा आवश्यक प्रमाणात फ्युएलस्टिक वाहनाच्या टाकीत सोडल्यानंतर ते हळूहळू इंधनात मिसळेल आणि त्याची कार्बन साफसफाई सुरू होईल आणि फ्युएल इंजेक्शन सिस्टम साफ होईल.
तुम्हाला गाडी चालवताना थोडे धक्के बसू शकतात पण ते तात्पुरते असू शकते. मग तुम्हाला वाढलेले पिकअप/ वाढलेली ताकद / जास्त मायलेज मिळेल. तुमच्याकडे जलद गती किंवा इंधन बचत करणे असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
१२) फ्युएलस्टिक उत्सर्जन पातळी कमी करू शकते?
होय. हे चाचणी मध्ये सिद्ध झाले आहे, की फ्युएलस्टिक उत्सर्जन पातळी मोठ्या प्रमाणात कमी करते.
फ्युएलस्टिकच्या अत्याधुनिक कार्यामुळे जास्तीत जास्त इंधन जाळले जाते.त्यामुळे कार्बन मोनोऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होतात .
त्याचबरोबर इतर पर्यावरणास हानिकारक वायू कमी होतात.
१३) फ्युएलस्टिकची चाचणी झाली आहे का? असेल तर कोणाकडून? काही चाचणी अहवाल उपलब्ध आहेत का?
अनेक नामांकित एजन्सी, लॅब, पब्लिक लिमिटेड कंपन्या आणि आयआयटी सारख्या संस्थांद्वारे त्याची चाचणी केली जाते.
सर्व चाचणी अहवाल विनंतीनुसार उपलब्ध आहेत.
१४) मी नुकतीच फ्युएलस्टिक वापरायला सुरुवात केली पण माझ्या कारला/ बाईकला धक्के बसल्यासारखे होते, असे का?
फ्युएलस्टिक सर्व प्रथम इंधन इंजेक्शन प्रणालीमध्ये अडकलेले कार्बन साफ करते. हे डिटर्जंट प्रमाणेच काम करते .
कार्बनचे हे तुटलेले भाग फ्युएलस्टिकच्या पहिल्या वापरानंतर सुरुवातीला अडथळा निर्माण करतात ज्यामुळे कार/वाहनाला धक्के बसू शकतात. परंतु हे सामान्य आहे आणि हे एक चांगले संकेत आहे की तुमची इंधन इंजेक्शन प्रणाली साफ होत आहे.
लवकरच तुम्हाला जाणवेल कि इंजिनची कार्यक्षमता वाढली आहे , पिकअपमध्ये वाढ झाली आहे आणि कार्बन मोनोऑक्साइड उत्सर्जनही कमी झाले आहे. जे PUC मध्ये दिसून येते.
सर्वसामान्यपणे अडकलेले कार्बन आपोआप निघून जाते परंतु आपण आपल्या मेकॅनिक कडून कार्बोरेटरची सफाई करून घेऊ शकता.
१५) फ्युएलस्टिकमुळे पेट्रोलमध्ये ऑक्टेनचे प्रमाण आणि डिझेलमध्ये सिटेनचे प्रमाण वाढते का?
होय. यामुळे इंधनाची बचत होते , इंजिनची कार्यक्षमता वाढते आणि उत्सर्जन कमी होण्यास मदत होते.
फ्युएलस्टिक कसे वापरावे ?
1 लिटर पेट्रोल/डिझेलसाठी 1 मिली फ्युएलस्टिक वापरण्याची शिफारस केली जाते.
ही प्रक्रिया ऐच्छिक असली तरी या पद्धतीने अनुसरण करण्याची सूचना केली आहे.
इंधन कॅप उघडा – अर्धे इंधन टाका, नंतर आवश्यक प्रमाणात फ्युएलस्टिक घाला आणि उर्वरित अर्धे इंधन टाका.
एकदा आवश्यक प्रमाणात फ्युएलस्टिक टाकल्यानंतर ते हळूहळू इंधनात मिसळेल आणि त्याचे कार्बन साफसफाई करण्याचे काम सुरू होईल आणि इंधन इंजेक्शन सिस्टम साफ होईल.
तुम्हाला थोडे धक्का बसू शकतात परंतु ते तात्पुरते आणि सामान्य असतात. केवळ सुरुवातीलाच होऊ शकते नेहमीसाठी नाही.
मग तुम्हाला वाढलेला पिकअप/ वाढलेली ताकद / जास्त मायलेज मिळेल. तुमच्याकडे जलद वेगासाठी फ्युएलस्टिक वापरण्याचा पर्याय आहे.
फ्युएलस्टिकची बाटली कशी उघडावी ?
वारंवार विचारले जाणारे प्रश्न वाचल्यानंतर,
दोन गोष्टी समजून घ्या.
सीलबंद बाटली कशी उघडायची आणि उत्पादन कसे वापरावे.
खालील दोन विभाग स्पष्ट करतील. यात चित्रे व व्हिडिओचा समावेश आहे.
बाटली कशी अनपॅक करावी आणि उघडावी.
ते कसे वापरायचे ते दुसरा विभाग स्पष्ट करेल.
Testimonials
प्रशस्तिपत्र
अग्रगण्य सार्वजनिक कंपन्यांपैकी एक,
मे . सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेड
यांनी त्यांच्या डिझेल जनरेटरसाठी फ्युएलस्टिक वापरले.
तुम्ही पाहू शकता की कंपनीने इंधनावर तब्बल २६% बचत केली आहे जी एक उत्तम पैसा आणि परकीय चलन बचतकर्ता आहे.
तसेच दुसरी मोठी कंपनी यांनी सुद्धा इंधनात जवळपास १९% बचत केली आहे व तसे प्रमाणपत्रही दिले आहेत.
विनंती केल्यास आपणास तसे रिपोर्ट पाहायला मिळतील.
नामांकित पब्लिक लिमिटेड कंपनी
डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड
हिमाचल प्रदेश यांचे प्रशस्तीपत्रक
हिमाचल प्रदेशमध्ये त्यांचा एक प्लांट असून त्यांनी
1450 KVA डिझेल जनरेटर चालवताना त्यांच्या डिझेलच्या
वापरात 19% बचत केली आहे, असे त्यांनी त्यांच्या पत्रात
नमूद केले आहे.
श्री निखिल जोशी
हे बुद्धिबळ शिक्षक आणि शेअर ट्रेडर आहेत ज्यांच्या कल्याण ( जिल्हा ठाणे,महाराष्ट्र ) येथे त्यांची दोन बुद्धिबळ अकादमी आहेत.
त्यांनी त्यांच्या 8 वर्षांच्या जुन्या स्कूटरमध्ये फ्युएलस्टिक वापरले आहे.
दोन दिवसांतच त्याचे इंजिन स्मुथ झाले त्याचप्रमाणे पिकअप तसेच इंधन बचतीतपण सुधारणा झाली.
ते सुमारे 25% पेट्रोल वाचवू शकले.
त्यांच्या गाडीचे PUC सर्टिफिकेट दाखवते की त्यांची जुनी BS 3 स्कूटर BS 6 वाहनापेक्षा कमी प्रदूषण उत्सर्जित करते.
ते त्यांच्या व्हिडिओ संदेशात सांगत आहेत की त्यांनी इंधनाची बचत कशी केली, उत्कृष्ट पिकअप तसेच उत्सर्जनामुळे होणारे प्रदूषण कमी केले.
श्री विक्रम जोग
जे टाटाचे माजी कर्मचारी आहेत.
ते आपल्याला सांगतात की त्यांनी त्यांच्या टाटा टियागो गाडीसाठी 30% पर्यंत इंधन बचत केली जी डॅशबोर्डमध्ये पूर्णपणे दिसत आहे.
सुरुवातीला त्यांना ऍव्हरेज 14 किमी प्रति लिटर मिळत असे परंतु फ्युएलस्टिक वापरल्यानंतर त्यांना सुमारे 18.3 किमी प्रति लिटर ऍव्हरेज मिळाले जे डॅशबोर्डवरच पाहिले जाऊ शकते.
श्री पुरुषोत्तम रानडे
हे व्यवसायाने कॅटरर आहेत आणि त्यांनी त्यांची स्कुटर फ्युएलस्टिक वापरून चालवली.
फ्युएलस्टिक वापरल्यानंतर ते इतके आनंदी आहेत की ते म्हणतात की स्कूटर रोज वापरल्यानंतरही पेट्रोलचे प्रमाण कसे कमी होत नाही मला माहित नाही.
श्री हर्षद शहा
यांनी त्यांच्या 10 वर्षे जुन्या इनोव्हा गाडी मध्ये फ्युएलस्टिक वापरले आणि त्यांना उत्कृष्ट परिणाम मिळाले. इंजिन खूप स्मुथ झाले, पिकअप वाढला आणि डिझेलच्या वापरात 20 ते 25% बचत झाली.
सुरुवातीला त्यांना त्याची ही जुनी गाडी विकायची होती .परंतु त्याच्या गाडीमध्ये फ्युएलस्टिक वापरल्यानंतर त्यांना गाडी नवीन असल्यासारखी वाटते आणि आता ती विकायची नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
श्री संजय वेलणकर
हे प्रसिद्ध व्यापारी आणि सक्रिय रोटेरियन असून त्यांची मारुती डिझायर गाडी आहे.
त्यांनी गाडीत फ्युएलस्टिक वापरले आणि गाडी सिंधुदुर्ग येथे नेली आणि परत डोंबिवलीला आणली.
ते म्हणतात फ्युएलस्टिक वापरल्या नंतर गाडीच्या ऍव्हरेज मध्ये 30% वाढ झाली आणि त्याच वेळी प्रदूषण देखील कमी झाले.
ते शिफारस करतात की फ्युएलस्टिक त्यांच्या सर्व मित्रांनी वापरावे आणि ज्यांना पर्यावरण तसेच त्यांचे पैसे वाचवायचे आहेत त्यांनी तर फ्युएलस्टिक नक्कीच वापरावे.
भारतातील एक अग्रगण्य तसेच अत्यंत सुरक्षित कंपनी
मे . रेझर पे यांच्याकडून सुरक्षित पेमेंट गेटवेद्वारा आपली रक्कम घेतली जाईल.
क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँकेद्वारे ऑनलाईन पेमेंट, Gpay , तसेच युपीआय आयडी याद्वारे आपण आम्हास सुरक्षितपणे रक्कम पाठवू शकता.
आपल्याकडून आम्हाला रक्कम मिळाल्यानंतर दोन दिवसा मध्ये आपल्या पत्त्यावर फ्युएलस्टिक कुरियर द्वारे पाठवण्याची व्यवस्था होते.
त्याचप्रमाणे कुरियर केल्यानंतर आपणास ट्रॅकिंग आयडी पाठवली जाईल.
This webpage explains about an innovative product, fuel stick, which is a fuel conditioner that reduces the consumption of fuel from 5 to 30%, Reduces harmful carbon emissions thereby decreasing air pollution.
Fuelstick increases pickup and efficiency of your vehicle and de-carbonizes your vehicle’s engine.
Fuel stick, an ultimate fuel conditioner can be used for any vehicles which uses petrol or diesel as their fuel.
Besides this it can also be used for petrol or diesel generators , pumps or any machine which is used in industry using petrol or diesel. It can also be used in ships and boats.
This Web page attempts to explain everything in Marathi language about the product Fuelstick and it has got following sections.
The video which explains the product, followed by frequently asked questions, How to use the product, The testimonials from the people in text as well as video format, the Purchase instructions and order cum contact us page.
जी – ३०, मयुरेश दर्शन, अम्मू आर्केड जवळ, म्हसोबा मैदान,
संभाजी मार्ग, सिंडिकेट,कल्याण [प]. पिन ४२१३०१
+९१ ९५९४७८०००५
info@sudhanenterprises.com
सकाळी १० ते सायंकाळी ६.३० वा
गुरुवार साप्ताहिक सुट्टी